मासाचे मनोगत मराठी निबंध | Masache Manogat Essay in Marathi

 
मी मासा बोलतोय,Masache Manogat Essay in Marathi
मासाचे मनोगत मराठी निबंध , Masache Manogat Essay in Marathi

मासाचे मनोगत मराठी निबंध | Masache Manogat Essay in Marathi

आज मी आपल्यासाठी मासाचे मनोगत मराठी निबंध , Masache Manogat Essay in Marathi निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.


मासाचे मनोगत


      मी सुट्टीच्या दिवशी नदीवर गेली होती आणि कळशीत पाणी भरून मी घरी आले . पण, नकळतच कळशीत एक मासा शिरला .  मी महादेवाच्या मंदिरात महादेवावर पाणी वहायला जात होते .परंतु अचानक कळशीतून आवाज आला. "अग ! ऐक ना, तू मला कुठे घेऊन चाललीस.पण माझ्या बद्दल काही जाणून तर घे ! " 


     मी मासा आहे . मी एक जलचरप्राणी आहे . मी पाण्यात राहतो . मला पाण्यात राहायला खूप आवडते . माझे सगळे बांधव ,मित्र सगळे  पाण्यात राहतात .  तसा मी तळ्यात , विहिरीत आणि नदी राहतो . मला एक शेपूट असते आणि लहान पर असतात . त्यांच्या सहाय्याने मी पोहतो . 


     पोहतांना मी खूप आनंदात असतो. त्याच वेळी अलगद जाळ्यात कधी अडकतो ते मलाच कळत नाही. त्यामुळे जाळ्यायातून मी बोटीत जातो .बोटीतून बाजारात आणि बाजारातून तुम्हा माणसांच्या ताटात येतो.मग तुम्ही माणसं माझ्यावर ताव मारतात .


       मी  पाण्यात रहणारा जलचर प्राणी आहे.मी  मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. माझ्यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. ती कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खनिजेही थोड्या प्रमाणात माझ्यापासून मिळतात.  कॉड, हॅलिबट, मुशी अश्या  माझ्या बर्याच जाती आहे .


     माझ्या यकृतापासून अ ,ड जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ब जीवनसत्त्व मिळू शकते. माझ्या चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. 


        मी डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापाचे (मलेरियाचे) निर्मूलन करण्याच्या कामी फार उपयोगात  येतो.  तसे मी लहान किटक ,मासे , शेवाळ खातो . मोठे मासे आम्हाला खातात . काही जण मला फिशटॅन्क मध्ये ठेवतात . तर काही जण मत्स्यालयात ठेवतात .तर काही जण बाजारात विक्रीला ठेवतात .   


     फिश टॅंक मध्ये कोणी आवडत म्हणून ठेवतात तर कोणी शोभा म्हणून ठेवतात. मत्स्यालयात लहान मुलं खूप कौतुकाने आणि आवडीने पाहायला येतात . मला त्यांचं कौतुक आणिं आवडीने पाहिलेलं आवडतो. त्यांना मला पाहून आनंद होतो . आणि मलाही त्यांना पाहून आनंद होतो. पण मला समुद्रात राहायला खूप आवडते . तेथे सगळे माझे भाऊबंद मला भेटतात .मला माझ्या मित्रांसोबत, भाऊं सोबत मोकळ्या पाण्याच्या जगात रहायला आवडत .तर मित्रांनो हा होता मासाचे मनोगत मराठी निबंध , Masache Manogat Essay in Marathi मधे  एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. कारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. धन्यवाद...


टीप : वरील मासाचे मनोगत मराठी निबंध याचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.
  • marathi atmakatha 
  • मी मासा बोलतोय !


Previous
Next Post »