माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi

माझी आजी मराठी निबंध , Mazi Aaji Essay in Marathi
माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi


माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निंबध , Mazi Aaji Essay in Marathi बघणार आहोत. हा निबंध तुमच्या बालपणातील आठवणी ताज्या नक्कीच करेल.


 माझी आजी


      माझ्या आयुष्यात, माझ्या आजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि मी या निबंधात तिच्याबद्दलचे माझे विचार सामायिक करू इच्छितो.

माझी आजी आहे तशी साधी , भोळी, कष्टाळू ,स्वभावाची सरळ. पूर्वी शिक्षणाला महत्व नव्हते परंतु माझी आजी इयत्ता  चौथीपर्यंत शिकली. तरी तिचा आवडता छंद वाचन . वेळेतवेळ काढून ती वाचते . काहीतरी वाचन करत असते . दररोज वर्तमानपत्र वाचते . तत्वज्ञान मासिक नेहमी वाचते. टीव्ही पाहते , बातम्या एकते . नेहमी सर्व बाबतीत सतर्क असते. ती जास्त शिकलेली नाही पण शिकलेल्याना मागे पाडते . तिच्या समोर  कलेक्टरही कमी पडतो. बोलण्यात वकीलही तिच्या समोर कमी पडतो . 



    माझ्या आजीचे नाव मोतन आहे . माहेरी तिला नरी म्हणतात . माझी आजी सर्वात आधी उठते . दररोज पहाटे चार वाजता उठते. आंघोळीला तिचा पहिला नंबर असतो. नंतर ती देव पूजा करते .पारायण करते.जपमाळ करते. चहा नाश्ता करून सूर्योदय होण्यापूर्वी ती शेतात पोहचते. आमच्यासाठी आजी शेतातून बोर , काकडी, टोमॅटो ,पालेभाज्या असे घेऊन यायची. ती खूप कठीण परिश्रम करते. ती दुग्ध उत्पादन व्यवसाय करते. त्यात ती स्वतः महनत करते. 


    उद्याचे काम ती आजच करते. ती आम्हाला नेहमी म्हणते , " कल करे सो आज कर, आज करे सो अब , सफलता तेरी चरण चुमेगी आज नही तो कल." म्हणून ती वेळे आधीच काम पुर्ण करते . दिवसभर ती आपल्या कामातच गुंतलेली असते.  हातपाय चालतात तोवर माणसाने काही तरी कार्य करत राहिले पाहिजे अशी तिची शिकवण आहे. 


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



      आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगणात झोपतो आणि सोबत आम्ही रात्री खूप  गप्पा मारतो. ती दररोज अम्हाला गोष्ट सांगते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्यासाठी नव -नवीन खाऊ बनवते. आम्हाला  पुर्वी च्या खूप जुन्या गोष्टी सांगते. 

      पूर्वी वीज नव्हती त्यामुळे त्यांचे जीवन कसे होते त्याबद्दल ती सांगते. त्यावेळी बस नव्हत्या , कोणतेही सुख सुविधा नव्हत्या , त्यांचे जीवन कसे चालायचे त्याबद्दल ती सांगत आमच्याशी गप्पा मारत बसायची असायची . आम्ही खूप कौतुकाने आणि उत्साहाने आजीच्या गप्पा ऐकायचे.


        माझी आजी आमच्या घरातली खजिना आहे. प्रत्येकाला आजी असायलाच पाहिजे; कारण आजीचे लाड, कौतुक, प्रेम करते; ते नेहमीच हवेहवेसे वाटते. माझी आजी दुधावरच्या सायी प्रमाणे आमच्या वर प्रेम करते. शेजारी-पाजारी घरातील काकूंना देखील आजीचा खूप आधार वाटतो. त्यांना कधी काही अडचण आली, तर आजी लगेच त्यांच्या मदतीला धावून जाते. 


      कुणाला गावी जायचे जायचे असेल ,लवकर उठायचेअसेल  तर ,झोपण्याण्यापूर्वी आजीला सांगून द्यायचो. आजी  मला लवकर उठाव आणि आजी आम्हाला सर्वात लवकर उठवायची. परीक्षेपूर्वी अभ्यास करायचा असायचा त्यावेळी ,आजी आम्हाला अभ्यास करण्यासाठी पहाटे लवकर उठायची. माझ सारं पाठांतर घ्यायची पाढे ,मनाचे-श्लोक, गीचेचा १५ वा अध्याय, स्तोत्र,कविता प्रश्न - उत्तरे सर्व .


  आणखी एक आजी आहे मला, माझ्या आईची आई. सुट्यांमध्ये जेव्हा मी मामाच्या गावाला जातो. तिथे असते माझी आणखी एक आजी. जेव्हा मी मामाच्या गावाला जाते तेव्हा आजी माझे सर्व लाड पुरवते. माझ्या आवडीच पदार्थ बनवते. मला एकदम, छान व मज़ेदार गोष्टी सांगते.  


दोन्ही आजी सारख्याच आहेत स्वभावाला, प्रेमात सर्व काही दोन्ही मध्ये सारखेच आहेत. मला तर खूप अभिमान वाटतो कि मला दोन आजी आहेत. या वरीष्ठ व्यक्तिच्या छत्रछायेत आम्ही मोठ होत आहोत.माझ्या दोन्ही आजींनी  मला दिलेले संस्कार आणि शिकवण मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या दोन्ही आजी खूप खूप आवडतात.




तर मित्रांनो हा होता माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाधन्यवाद.

टीप : वरील माझी आई मराठी निबंध याचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.


  • माझी आजी निबंध
  • majhi aaji essay in marathi
  • short essay on majhi aaji in marathi
  • aaji var nibandh
Previous
Next Post »