माझे आजोबा मराठी निबंध | Maze Ajoba Marathi Nibandh | My Grandfather Essay in Marathi

माझे आजोबा मराठी निबंध | Maze Ajoba Marathi Nibandh | My Grandfather Essay in Marathi

माझे आजोबा मराठी निबंध | Maze Ajoba Marathi Nibandh | My Grandfather Essay in Marathi
माझे आजोबा मराठी निबंध | Maze Ajoba Marathi Nibandh | My Grandfather Essay in Marathi



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध , Maze Ajoba Marathi Nibandh , My Grandfather Essay in Marathi बघणार आहोत. हा निबंध तुमच्या बालपणातील आठवणी ताज्या नक्कीच करेल.


माझे आजोबा

         माझे आजोबा चैतन्यपुर्ण असलेले मनाने प्रसन्न असणारे हास्य विनोद करत वावरतात .यामुळे सगळ्यांना त्यांचा सहवास आवडतो. माझे आजोबा धार्मिक प्रवृत्ति चे होते . त्यांचा दिनक्रम पहाटे  तीन वाजे पासून आरंभ व्हायचा . 


     पहाटे चार वाजता पुर्ण गावात प्रभातफेरीला जातात . हा त्यांचा नित्य नियम आहे .कार्तिक महिन्यात मंदिरात काकडा आरती होते . पहाटे पाच सहा कृष्ण मंदिरात नचुकता जातात . घरी आल्यावर देवपुजा, पारायण ,जपमाळा करायचं . ज्ञानेश्वरी ग्रंथ नित्य नियमानुसार वाचतात . नंतर चहा नाश्ता करायचं . मंदिरातील आवार पुर्ण  स्वच्छ ठेवतात . बरे नसतांनाही त्यांच्या दिनक्रमात बदल होत नसतो.


      दररोज शेतात जायचे खुप काबाड कष्ट करायचे . शेतात गेले की,शेतातून मक्याच कणिस ,मुगाच्या शेंगा ,बोरं ,भेंडीची भाजी ,पाले भाज्या , टोमॅटो ,काकडी ,टरबूज असे बरेच काही आणायचे . घरातील शेतातील सर्व जबाबदारीने पार पाडत . ते शेतात चार माणसांची काम एकट्याने करत असत . थकून आल्यावर आराम करतात . परंतु त्यांचे वय वाढत असल्याने ते देखरेख करतात . पाऊस केव्हाही पडला की ,ते स्वतः पायी शेतात जातात . आणि शेता ची अवस्था कशी आहे ते बघतात . त्यांचा हा एक नियम होता .


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



      वाढत्या वयामुळे ते त्यांच्या मित्रात वेळ घलवतात . सकाळी अणि संध्याकाळी मंदिराच्या आवारात मित्रांसोबत वर्तमान पत्र वाचत ,गप्पा गोष्टी करायचं . त्यांची जेवणाची वेळ सकाळी १० तर संध्याकाळी ६ किंवा सकाळी अकरा तर संध्याकाळी  सात असते  . जेवणाची वेळ काटेकोर पणे पाळतात .


        दररोज रात्री झोपण्या आधी आम्हाला गोष्ट सांगतात. आमच्या शी गप्पा मारतात . मी लहान असतांना मला सदैव मंदिरात खेळवत . सकाळी संध्‍याकाळी  मी पटकन तयारी करुन आजोबांसोबत जायची . मी शाळेत जायला लागले आणि माझे खेळायला जाणे कमी झाले .


       माझे आजोबाजसे बोलायचे तसे चालायचे . त्यांनी दिलेला शब्द परत जात नाही . ते सदैव शांत राहतात. माझ्या आजोबांना  गाणी गाण्याची आवड आहे .  ते शेतात काम करत असतांना गाणी गायचे . रस्त्याने चालत असतांना गाणी गात गात यायचे . त्यांचा आवाज खूप मधुर येतो. 


     आमच्या गावात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भागवत् कथा प्रारंभ होते . माझे आजोबा भागवत कथेला आवर्जून जायचे . त्यांचे व्यक्तिमत्व  सदैव प्रसन्न मुर्ती आणि हास्यमुख असतात .


          माझे आजोबा माझ्या सोबत नेहमी मनमोकळे  बोलतात. म्हणून मी सुध्दा मोकळया मनाने त्यांच्या सोबत बोलते . मागच्या वर्षी शाळेतून सहल जात होती . मी आजोबांना सांगितलें त्यांनी सहलीला पाठविण्याचा हट्ट धरला . त्यांनी सांगितले " तु सहलीला जा बाहेर चे जग बघ . जगाची ओळख करून घे . पुढे कामात येेईल . या सहली चा अनुभव घे .अनुभवाने माणूस शिकतो."  


      माझे आजोबाना  माझी खूप काळजी वाटते . कारण मी साध्या आणि सरळ स्वभावाची असल्याने काळजी करतात . ते नेहमी मला सांगतात ," तुझ्या साध्या सरळ स्वभावाचा कुणीही फायदा नको घ्यायला  . तुझ्यातील चांगल्या गुणांची कदर व्हायला हवी . तुझे सुप्त गुण ओळखून कदर करायला हवी ." माझ्या आजोबांनी मला घडविले . माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला . मी कोणत्याही परीस्थितीत खंबीरपणे उभी राहील असे घडविले. 


मी धन्य आहे . माझ्या आजोबांनी मला संस्कारांची शिदोरी दिली .



तर मित्रांनो हा होता माझे आजोबा मराठी निबंध | Maze Ajoba Marathi Nibandh | My Grandfather Essay in Marathi एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाधन्यवाद.


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते 

  • aJOBA var nibandh
  • mazE aJOBA nibandh in marathi
  • माझे आजोबा निबंध
Previous
Next Post »