महात्मा गांधी मराठी निबंध| Mahatma Gandhi Essay in Marathi

महात्मा गांधी मराठी निबंध| Mahatma Gandhi Essay in Marathi
महात्मा गांधी मराठी निबंध| Mahatma Gandhi Essay in Marathi


महात्मा गांधी मराठी निबंध, Mahatma Gandhi Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध, Mahatma Gandhi Essay in Marathi बघणार आहोत. सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला स्वतंत्रता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले.


महात्मा गांधी



     भारताला स्‍वतंत्र करण्‍यासाठी अनेक महान स्‍त्री व पुरूषांनी आपले संपुर्ण जीवन  राष्‍ट्राला अर्पण केले महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. महात्‍मा गांधी युगपुरूष होते. त्‍यांच्‍या बद्दल सर्व विश्‍व आदराची भावना ठेवत होते. 


     गांधीजींना  भारतीय लोक प्रेमाने 'बापू ' म्हणत. संपूर्ण भारत त्यांना "राष्ट्रपिता  " मानतो.सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला गुलामगीरीच्‍या बेळीतुन मुक्‍तता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले.


    महात्मा गांधीजींचा  जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी बालपणा पासूनच हुशार होते. महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय नेते होते . प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो.त्याच बरोबर ते आदर्श समाजसुधारक होते . तसेच  कुशल अर्थज्ज्ञ होते. शालेय शिक्षण संपवून गांधीजीची उच्च शिक्षणासाठी इंग्लडला गेले. 


" रघुपति राघव राजाराम.. पतित पावन सीताराम…

हे गाणे ते नेहमी म्हणत असत . 


     १८८८ साली गांधीजीं इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होऊन भारतात परत आले . भारतात परत आल्यावर त्यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला. ते खूप शिकले; पण  त्यांनी नोकरी केली नाही.  त्यांनी वकिली केली नाही . ते आयुष्यभर देशाच्या स्वतंत्र्यासाठी झटले . त्यांनी इंग्रजांना ' चले जावो ' असे ठणकावले.



हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

          १९०३ मध्ये महात्मा गांधीजीं इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. गांधीजीं आपल्या हातून घडलेल्या चुका नेहमी प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला . "चूक स्विकारणे हे केर काढण्यासारखे आहे. जे तुमचे मन स्वच्छ आणि साफ करते." असे गांधीजी नेहमी म्हणत असे . १९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. 



        मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला. म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजीनी 'दांडी यात्रा' काढली.त्यांनी सत्याग्रह शिबिराची स्थापना केली .त्यांचे आंदोलन मानवाच्या अधिकारांची संरक्षण करण्यासाठी सुरू केले गेले आहेत.


    महात्माजींनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. त्यांनी आपल्या पोशाखात, त्यांचा आहार शाकाहारी होता . महात्मा गांधी प्रदेशात असताना शाकाहारी पदार्थ मिळत नसल्यामुळे ते उपाशी राहत असायचे. परदेशात राहून शाकाहारी माणसांना शोधुन  एक संघटना तयार केली . आणि  त्याचे ते अध्यक्ष झाले होते . भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा  छोट्या वस्‍तीत राहणे त्यांनी पसंत केले. 


" व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरुन नाही तर त्याच्या चारित्र्यावरुन होते."  अशा महात्मा गांधींची राहणी अगदी साधी होती.त्यांच्या पोशाख धोती  आणि खांद्यावर नेहमी सूती शाॅल  असायची. ते स्वत: चरखा चालवून सूत काढायचे. ते नेहमी सत्य बोलत . त्यांना अन्याय खपत नसे . ते अन्यायाविरुद्ध लढत राहिले .

     सर्वाना सत्‍य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे आपले आवडते बापू आता आपल्यात राहिले नाहीत, परंतु त्यांची तत्वे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहतील .


तर मित्रांनो हा होता महात्मा गांधी मराठी निबंध, Mahatma Gandhi Essay in Marathi  एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.


टीप : वरील निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
  1. Essay On Mahatma Gandhi In Marathi
  1. Mahatma Gandhi Information In Marathi Essay
  2. राष्ट्रपिता महात्मा गांधी 
  3. Rashtrapita Mahatma Gandhi
  4. mahatma gandhi nibhandh marathi
  5. maza avadta neta
  6. maza avadta neta marathi nibandh



Previous
Next Post »