माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Nibandh in Marathi

माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Nibandh in Marathi
माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Nibandh in Marathi


माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Nibandh in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी शाळा मराठी निबंध , Mazi Shala Nibandh in Marathi, essay on my school in Marathi बघणार आहोत. 


माझी शाळा

     
  माझ्या शाळाचे नाव 'माध्यमिक विद्यालय धारेश्वर प्रसारक मंडल ' आहे .माझ्या गावाच्या कृष्ण मंदिरा जवळ माझी शाळा आहे . आता गावाबाहेर नवीन शाळा बांधली आहे. माझी शाळा खूप सुंदर आहे.माझ्या शाळेत ५ वी ते १० वी पर्यंत चे वर्ग आहे . माझ्या शाळेचा एकच गणवेश ठरलेला आहे. 


    शिस्तीच्या बाबतीत विशेष महत्व माझ्या शाळेत दिले जाते .शाळेसमोर मोठे पटांगण आहे. शाळेच्या  पटांगणात खेळण्यास  छान जागा आहे . शाळेच्या आवारात छोटी- मोठी  हिरवीगार झाडे लावलेली आहेत .माझ्या शाळेत विविध फुलांची झाडे आहेत. आम्ही दररोज झाडांना पाणी घालतो. 


    पटांगणाच्या मध्यात राजस्तंभ आहे . 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला तिरंगा झेंडा फडकवला जातो. सर्व कार्यक्रम पटांगणात होतात . दररोज राष्ट्रगीत, प्रार्थना , प्रतिज्ञा पटांगणात होते.


     पटांगणा समोर सरस्वती देवीची पाषाणाची मुर्ति आहे .आम्ही दर शुक्रवारी फुलांची माळ करुन आणतो. नारळ फोडतो. आरती करतो . प्रसाद वाटतो . 


       प्रत्येकाच्या जीवनात शाळेतील खूप व विशेष महत्त्व असते आणि शाळेच्या खूप आठवणी असतात. जीवनयात्रेत शाळेच्या भरपूर आठवणी असतात . मला घडवण्यात माझ्या शाळेचाही मुख्य वाटा आहे ,जसे माझ्या आई वडील यांचा आहे . माझ्या संस्कारांची शिदोरी मिळण्यात माझ्या शाळेचाही  वाटा आहे. 


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



     माझ्या शाळेत वाचनालय आहे.  वाचनालायामध्ये खूप पुस्तके असतात. आम्ही सर्व  विद्यार्थी विविध पुस्तके वाचतो. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप चांगले आहेत. ते आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवतात . कोणतीही गोष्ट खूप समजून सांगतात. आमचा आत्मविश्वास वाढवतात. आमचे मार्गदर्शन करतात . आम्हाला प्रेरणा देतात . विविध स्पर्धेत भाग घेण्यास आम्हाला प्रोत्साहन करतात . 


    माझ्या शाळेत विविध शिबिरे राबवली जातात.  माझ्या शाळेतून दरवर्षी सहल निघते . मी दरवर्षी शाळेतून सहलीला जाते.  सहलीला जाण्यात मला खूप आनंद मिळतो. माझ्या शाळेत मोफत शिक्षण दिले जाते. शाळेतील शिक्षक खूप मदत करतात. 


      शाळा ही आपल्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावते. मला माझ्या शाळेबद्दल खूप अभिमान आहे. मला असे वाटते कि, शाळा सोडून कधीच जावे असे  नाही . आम्हाला पण आमच्या शाळेचे नाव उज्जवल कराचे आहे. मोठे झाल्यानंतर माझ्या शाळेचे नाव कमवायचे आहे .अशी  ही  माझी शाळा आहे आणि मला माझी शाळा खूप  खूप आवडते. मी या ज्ञानमंदिराला कधीच विसरणार नाही.



तर मित्रांनो हा होता माझी शाळा मराठी निबंध , Mazi Shala Nibandh in Marathi, essay on my school in marathiतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाधन्यवाद.




टीप : वरील माझी शाळा मराठी निबंध याचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.
  • mazi shala nibandh marathi
  • mazi shala nibandh
  • marathi essay mazi shala nibandh
  • My School Essay in Marathi
  • essay on my school in Marathi

Previous
Next Post »