सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi

सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi

सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi
Essay On Soldier In Marathi



नमस्कार मित्रांनो आज आपण  सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi  बघणार आहोत.

सिमेवरील जवान चे मनोगत


मी तीन वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले. आजोबांनी व आईने मला मोठे केले. सैन्यात दाखल व्हायचे असे मी ठरवले. पाचव्या इयत्तेपासूनच मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. मी वसतिगृहात राहायचो. मग मी सैनिकी महाविदयालयात नाव घातले. तेथे पदवी मिळवतानाच मला सैन्यात नोकरी मिळाली. पहिले दीड वर्ष वेगवेगळे तांत्रिक शिक्षण घेण्यात गेले. ते पूर्ण झाल्यावर 'मेजर'(major) म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली.

आमचे काम खूप अवघड आहे. आम्ही जेथे असतो तो भाग अतिशय थंड आहे. शिवाय आम्हांला डोळ्यांत तेल घालून सीमेची राखण करावी लागते. शत्रूकडून मारा सुरू झाला, तर आम्हांला आपले ठाणे सोडता येत नाही. शत्रूच्या हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते. माझ्या सैनिकी जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही. पण माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो. ते मी माझे परमभाग्य समजतो.

दहा महिने झाले...घर सोडायला तेव्हा  सुद्धा घरी दोन दिवस होतो. पण ईकडे सीमेवर अकस्मात गड़बड़ झाली. दहशत वादी हल्ले सुरू झाले आणि मंजूर रजा रद्द झाली. तातडीने हुकूम आला होता. डोळे पुसतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले. आणि दोन दिवसांचा खडतर  प्रवास करित या सीमेवरील छावनीत दाखल झालो.. वाटेत जनतेने खुप आपुलकिने वागवले तेव्हा मनाला खुप दिलासा मिळाला..

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



तेव्हा पासुन आजपर्यंत मी या मोक्याचा ठिकाणी पहारा देत ऊभा आहे . हे नाके भारतच्या उत्तर सीमेवरील आहे. येथून दुर वर शत्रुची चौकी , तिथे ही माझासारखा त्यांचा एक जवन तासनतास  पहारा देत ऊभा आहे.  डोक्यावर दुर्बीन लावून आम्हाला सतत चौकसपने पहारा करावा लागतो. शत्रु ची थोड़ी शी ही हालचाल दिसली की आम्हाला नोंद घ्यावी लागते. डोळ्यात तेल घालून आपल्या भूमीचे रक्षण करावे लागते. अशावेळी मनात येते की, का आलो मी? या सीमेवर, माझ्या गावात मी सुखी नव्हते का?

आजही मला गावातले ते दिवस आठवतात...खाऊन पिऊन सुखी  होतो. पण कुठून वाटले, केवळ शेतीवर गुजरान होई ना, घराबाहेर पडणे  आवश्यक होते.  लहानपणा पासून सैनिक होण्याचे स्वप्न. सैनिक होऊन मोठी कामगीरी गाजवली होती. आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतु ने उत्साह ने सैन्यात भर्ती झाली. 

सीमेवर प्रचंड थंडी असते.  अशावेळी कामाचा कंटाळा येतो पण लगेच कर्तव्य ची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो. पहिले महिन्यांत 1 ते 2 वेळा पत्र यायच. आता मोबाइल असल्याने घरची खुशाली कळते . प्रथम देश सेवा नंतर घर. सण आला की सर्वंच्या शुभेच्छा येतात. अनेक माता भगिनी फराळ , रक्षा बंधनला राखी पाठवतात. थंडी चे दिवस आले कि स्वेटर, मफलर पाठवतात..

असे हे माझे जीवन...

जय हिंद!!



टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • THE OCCULT OF THE SOLDIERS ON THE BORDER ESSAY IN MARATHI 
  • Javana che manogat Marathi Nibandh
  • एका जवानाचे मनोगत मराठी निबंध

Previous
Next Post »