माझे बाबा मराठी निबंध | Maze Baba Nibandh | My Father Essay in Marathi

Maze Baba Nibandh
माझे बाबा मराठी निबंध | Maze Baba Nibandh | My Father Essay in Marathi


माझे बाबा मराठी निबंध , Maze Baba Nibandh , My Father Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण माझे बाबा मराठी निबंध , Maze Baba Nibandh , My Father Essay in Marathi  बघणार आहोत. 


माझे बाबा


      बाबा म्हणजे घराचे छत्र. माझे बाबा सकाळी लवकर उठतात. सूर्यनमस्कार करतात. त्यानंतर ते व्यायाम करतात. सकाळी देव पूजा करतात. नंतर महादेवाच्या मंदिरात जातात. देवाचे दर्शन घेतल्यानंतर घरी आल्यावर चहा नाश्ता करतात.


    माझे बाबा शेतकरी आहे. माझ्या बाबांचे नाव मणिलाल आहे. बाबा शेतीत स्वतः मेहनत करतात . मी आई ,ताई आणि छोटा भाऊ मिळून बाबांना शेतात मदत करतात . बाबांचे काम खूप मेहनतीचे असते  . त्यामूळे ते खूप थकतात . कधी कधी बाबा आमच्या सोबत गप्पा करतात. त्यांनी आम्हाला मेहनत करायला शिकवले .


     माझे बाबा कोणत्याही कार्यक्रमाला दिलेल्या वेळेत जातात . मी नेहमी दिलेल्या वेळेत काम करावे ,असा त्यांचा आग्रह असतो. मी ते काम वेळेत करते. बाबा आपल्यांवर भरपूर प्रेम करतात, पण ते आपल्यांला दाखवत नाही. माझ्या बाबांची मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा शांत आणि संयमी स्वभाव.

माझे बाबा ह्या विषया शिवाय हा निबंध खाली दिलेल्या विषयांना वर सुधा आसु  शकतो.
  • बाबाण वर काही शब्द.
  • Essay on my father
  • माझे वडील.
  • माझे पापा .


     दिवाळी आली  कि बाबा सगळ्यांना  हवे तसे कपडे घेऊन देतात. मात्र ते स्वत:जुने कपडे वापरतात पण आपल्या मुलांना नवीन कपडे घेऊन देतात.  बाबा नेहमी आमचा  भविष्या चा विचार करत असतात, ते आम्हाला ओरडतात हे खर आहे . पण ते असे करतात कारण आपण आपल्या आयुष्यात  काही चागले करावे म्हणूनच त्यांना आपली खूप कळजी असते. त्यांनी मला धीर धरायला आणि शांतपणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने समस्यांकडे  बघण्यास शिकवले आहे.   आम्हाला बर नसल तर बाबांना रात्रभर झोप लागत नाही. ते आमची काळजी  करत बसतात.  बाबा आमच्या साठी जीवन भर खूप कष्ट करतात . ते आमच्या साठी स्वताच्या जीवनाचा रान करतात, आम्हाला हवी असलेली प्रत्येक वस्तू ते आम्हाला आणून देतात . असे माझे  बाबा असतात. 


माझ्या बाबांन वर माझे खूप प्रेम आहे आणि मला माझे बाबा खूप खूप आवडतात.


तर मित्रांनो हा होता माझे बाबा मराठी निबंध | Maze Baba Nibandh | My Father Essay in Marathi  मधे  एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाकारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. धन्यवाद...


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

Previous
Next Post »