माझी आई मराठी निबंध | Mazi Aai essay in Marathi | Majhi Aai Marathi Nibandh

माझी आई मराठी निबंध , Mazi Aai essay in Marathi ,
 माझी आई मराठी निबंध , Mazi Aai essay in Marathi 


माझी आई मराठी निबंध , Mazi Aai essay in Marathi ,  Majhi Aai Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो आज आपण माझी आई मराठी निबंध , Mazi Aai essay in Marathi ,  Majhi Aai Marathi Nibandh  बघणार आहोत. या लेखामध्‍ये पुर्ण 2 निबंध देण्‍यात आले आहे. चला तर मग सुरूवात करूया माझी आई मराठी निबंधाला. 


माझी आई निबंध क्रंमाक 1

  

   माझी आई मला खूप खूप आवडते.  माझे माझ्या आई वर खूप प्रेम आहे. मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही . माझी आई माझे मन कधीच दु:खवत नाही. घरात आई नसली की , माझे मन घरात लागत नाही. माझी आई मला समजून घेते.ज्यांची आई नसते त्याची व्यथा जसे की, "स्वामी  तिन्ही जगाचा आई विना भिकारी ".


    माझी आई एक गृहीणी आहे. घरात सर्व प्रथम  आईच उठते. ती मला दररोज लवकर उठवते. मला उठवतांना ती प्रेमाने हात फिरवते. तिचा स्पर्श  ,तिची येन्याची चाहूल नकळत समजते. मला चांगल्या सवयी लावते.मला शिकवते. चूकल्यावर शिक्षा करते . मी माझ्या आईमूळे यशाच्या पायरीवर पुढे चढते. त्यात यशात माझ्या आईला श्रय देते. माझी आई माझ्या साठी खूप मेहनत करते. स्वंंयंंपाक करण्यात ती कुुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला 'अन्नपूर्णाअसे संबोधून सतत कौतुक करत असतात.


  आईचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. माझी आई मला सदैव समर्थन देते. ती मला तिच्या अनुभवांच्या आधारे आत्मविश्वास देते आणि मला जीवनातील विविध स्तरांवर अधिक प्रगतीसाठी समर्थन करतात.  त्‍यामुळे माझी आई माझा आदर्श आहे.


       प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असेल ,महत्त्वाची भुमिका असेल तर ती "आई" . आई हा शब्द किती सोपा आहे,परंतू त्या शब्दा  मागे लपलेले तिचे प्रेम ,माया ,करूणा ,हे सांगतांना शब्द संपतील ,हे सांगणें कठिण आहे.



तर मित्रांनो हा होता माझी आई मराठी निबंध , Mazi Aai essay in Marathi ,  Majhi Aai Marathi Nibandh  मधे  एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाकारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. धन्यवाद...


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-


माझी आई निबंध क्रंमाक 2


    स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" मात्र हे वाक्य खर आहे. आपल्या कडे पैसा असून काही फायदा नाही , पण डोक्यावर मायेने हात फिरवीणारी आई नसेल तर जीवन व्यर्थ  आहे. जन्म देऊन जगात आणणारी आई जणू देवाचे एक रूप आहे. देवाने दिलेली एक देन ती म्हणजे आई.आई ही ईश्वराचे  दुसरे रूप आहे.त्याच प्रमाणे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची,विश्वासाची आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आई .


    माझ्या आईचे नाव निर्मल आहे. जसे नाव तसे गुण  ,खुप निर्मळ मनाची माझी आई .आई मायेचा सागर ,आई जीवनाचा आधार,आई आपल्या सर्व चूका पोटात घेऊन क्षमा करते. माझी आई माझ्यासाठी सर्वकाही आहे. आज मी तिच्या मूळे हे सुंदर जग पाहू शकते.आई जणू माझी एक मैत्रीण.माझी आई माझ्या जीवनात वेळोवेळी मार्गदशन करते . माझी आई माझ्या भावना समजते आणि माझ्या वाईट प्रसंगात मला साथ देते . माझी आई मला शिस्तबद्ध , विश्वसनीय ,वेळेची शिकवण देते. माझ्या शाळेचा अभ्यास घेते . तिने आम्हा सर्वांना चांगले संस्कार देऊन घडविले . तसेच माझ्या जीवनातील आई हि सगळ्यात पहिला गुरु आहे. ती  नेहमी आम्हाला योग्य मार्ग दाखवते अाणि योग्य प्रकारे मार्गदर्शन करते. 

       माझी आई माझ्या साठी मायेचा सागर आहे. माझी  आई माझ्या साठी देव आहे.माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे.माझ्या आईची माझ्यावर असणारी  मायेची तुलना करता येणार नाही. कधीपण कोणतीही वस्तूची गरज भासली की ,पहिला ओठांवर येणारा शब्द म्हणजे आई.सकाळी उठली की, दिवसाची सुरुवात आई च्या दर्शनाने होते,आई शब्दा ने होते. म्हणून मला माझी आई खूप खूप आवडते.


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-


       आई हा शब्द भावना आणि प्रेमा ने भरला आहे.आई या अमूल्‍य शब्दाचे मूल्य मुलांना समजते. ज्यांना आई नाही त्यांच्या मनावर कोणता प्रसंग अाला असेल , कशी वेळ आली  असेल याची कल्पना सर्वांना असेल . म्हणून ज्याचा जवळ आई आहे तो श्रीमंत आणि त्यांना अभिमान वाटला पाहिजे .


          पण या जगात अशी मुलही आहे जी आपल्या  आई - वडील यांना ओझे समजतात. कधी कधी काही स्वार्थी मुलं आईला वृद्धाश्रमात सोडतात. ही लाजिरवाणी बाब आहे. आपली आई मुलांना घडवताना संघर्ष करते . मेहनत करत, दिवस रात्र एक करते ,मुल आजारी पडल्यावर रात्र - रात्र जागरण करते आणि त्यांना लहानाचे मोठे करते ,मुलांना  घडवते. अणि आजचा  काही मुलांना  आईला सांभाळण्याची वेळ आली तर तिला ओझा समजले जाते. वृद्धा आश्रमात सोडले जाते .असे काही कानावर पडल्यावर , डोळ्यांनी पाहिलें तर डोळ्यात अश्रु येतात. अणि शरमेने खाली मान जाते. 


       आई ममते चा सागर आहे. आईची तुलना जगात दुसरे कोणाशीही करता येणार नाही. आई इतके प्रेम , ममता ,संस्कार ,प्रेरणा दुसरों कोणीही देऊ शकता नाही. आज आपण सर्व हे सुंदर जग आई मुळे बघतो आहे.त्यांनी दिवस रात्र एक करुन  आपल्याला घडविले.त्या आई - वडील यांची सेवा करायला मला आवडेल.




तर मित्रांनो हा होता माझी आई मराठी निबंध , Mazi Aai essay in Marathi ,  Majhi Aai Marathi Nibandh  मधे  एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाकारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. धन्यवाद...



टीप : वरील माझी आई मराठी निबंध याचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.


  • Beautiful Marathi essay on mother
  • mazi aai nibandh in marathi
  • majhi aai nibandh marathi
  • majhi aai nibandh in marathi
Previous
Next Post »