मी झाड बोलत आहे | Autobiography of Tree in Marathi

मी झाड बोलत आहे | Autobiography of Tree in Marathi 

मी झाड बोलत आहे | Autobiography of Tree in Marathi
मी झाड बोलत आहे | Autobiography of Tree in Marathi



नमस्कार मित्रांनो आज आपण  मी झाड बोलत आहे | Autobiography of Tree in Marathi बघणार आहोत.

मी झाड बोलत आहे


     मी झाडावर बसलो आणि माझे मित्र मंडळी सर्व मला पाहून झाडावर चढली . झाडावर आल्यावर सर्व मित्रमंडळी झाडांची पाने, फांद्या तोडून खेळत होती. "अरे , मुलांनो ! तुम्ही हे काय करत आहात ? तुम्ही  माझ्या  पारंब्या तोडून तुम्हाला काय मिळेल ? मला इजा करू नका . तुमच्या सारखाच मलाही त्रास होतो. मला ही  दुःख होतं." अचानक आवाज कुठून आला .आम्ही पाहायला लागलो, कुठून आला आवाज ! मी झाड बोलत आहे. अरे ! झाड कधी बोलायला लागले??

     तुम्ही मुलं माझ्या पारंब्या तोडून मला त्रास देत होता. मग , तुम्ही माझी व्यथा ऐका .

    खूप खूप वर्षापूर्वी आम्ही सर्व मित्र मंडळी तुमच्या सारखीच एकत्र राहायचो . खूप आनंदाची आणि मजेचे दिवस होते.  आम्ही सर्व पशु , पक्षी , मानव सर्वजण गुण्यागोविंदाने जंगलात रहात होते.  सर्व प्राणी जंगलातून आमची पाने  खायची , फळे खायची,  थकून-भागून आमच्या सावलीत येउन आराम करायची. माझ्या अंगा खांद्यावर येऊन पक्षी खेळत बसायची . सायंकाळी सर्व पक्षी येऊन माझ्या पारंब्याांवर बसायची.  जसे की शाळा भरलेली असायची. त्यांचा तो किलबिलाट ऐकून त्यांची चर्चेची सभा भरली आहे , असे वाटायचे. 

   पक्ष्यांची घरटी माझ्या पारंब्यांवरच असते. त्यांना त्यांची घरटी बनवण्यास खूप मेहनत लागते.  तुम्ही उन्हातान्हातून आल्यावर माझ्या सावलीतच तुम्ही आराम करायला बसतात. मी कुणा जवळ भेदभाव करत नाही. माझ्यासाठी पशू, पक्षी, मानव सारे एक सारखे आहेत. पण तुम्ही लोकं स्वताच्यासाठी जंगल तोडतात . परंतु तुम्ही विचार करत नाही .या पशुपक्ष्यांची घरटी  या झाडावर असतात . आणि त्यांचे छत्र हिरावून घेतात. 

    पारंब्यांना लटकून तुम्हाला वाकुल्या दाखवणारी माकडे, हे सगळं बघितलं कि आम्हाला खूप आनंद होतो. पक्षी माझी फळ खातात . वाटसरू रस्त्याने भर दुपारी येतात आणि माझ्या छायेत बसून आराम करतात . प्राणी माझ्या सावलीत येऊन बसतात . मी सर्वांना छाया देतो. माझ्याकडून पशुपक्ष्यांना अन्नछत्र मिळायचे. मला खूप बरे वाटायचे परंतु, आता तुम्ही आमची संख्या कमी केलीआहे.

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



       झाडे तोडतात , जंगलतोड करतात त्यामुळे झाडांची संख्या कमी होऊ लागली आणि पाऊस कमी होऊ लागला . त्यामुळे तुम्हीच धोक्यात येत आहात. झाडाझुडपांमुळे जमिनीची  माती धरून ठेवतात, याने जमिनीचा पोत टिकून राहतो. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही, त्याला आत्महत्या करावी लागणार नाही.

        आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले (रानमेवा) आणून विकतात. त्यांच्यावर त्यांचे पोट भरते. झाडे तोडून,वणवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात. तुम्ही जंगलात वणवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते.माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो . 

    वडाच्या पारंब्याना लटकणे, चोरून आंबे पाडणे, मोठ्या झाडाच्या फांदीला झूला झूलने; या साऱ्या आठवणीनी तुमचे बालपण सजले होते. पण ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे, पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार कराल , असे अनुभव आमच्या मुलांना मिळाले नाही . या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवनचक्र प्रभावित करत आहात. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश लिहत आहात. 

    ऑक्सिजनचे(oxygen) घटत चाललेले प्रमाण, ओझोन(Ozone) ची कमतरता या सर्व गोष्टी जर आज आटोक्यात आणल्या नाहीत तर पुढे जाऊन सर्वच जीवसृष्टी धोक्यात येईल. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला कि तुम्हाला पाणीटंचाई जाणवते. दरवर्षी आमचे असंख्य भाऊ-बंध तोडले जात आहेत. वट सावित्री पौर्णिमेला झाडाजवळ जाण्यात ऐवजी, बाजारात जाऊन वडाच्या फांद्या विकत घेऊन घरी वडाची पूजा करतात . दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकून देतात, ही तर या झाडाची विटंबना आहे, पूजा नव्हे !

    तुम्हा माणसांच्या कर्मामुळे सगळ्यांचेच अस्तित्व धोक्यात येईल. मी काय , आज आहे उद्या नाही .म्हणून कोणाला तरी माझ्या मनातलं सांगावं आणि तुम्ही आजची पिढी आहेत. तुम्ही तरी तुमच्या बुध्दीच्या वापराने या निसर्गाचा सांभाळ करावा . अशी माझी इच्छा मी तुमच्यापुढे व्यक्त केली . यासाठी तुम्ही "पाणी अडवा पाणी जिरवा" ,  "झाडे लावा, झाडे जगवा" या मोहिमांचा वापर करून निसर्गाचा सांभाळ करा . माझी काळजी घेणे आवश्यक आहे . त्यामुळे  तुम्हाला  ऑक्सिजन मिळेल , शुद्ध हवा मिळेल ,पाऊस नियमित वेळेवर येईल . यासाठी दरवर्षी झाडे लावा . माझी संख्या वाढवा . मला विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही नक्कीच बदल कराल . एवढे सांगून मी पुर्ण विराम देतो .



टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • me zad bolat ahe
  • मी झाड बोलतोय
  • झाडाचे आत्मवृत्त
  • Zadachi Atmakatha
Previous
Next Post »