मी कचरा बोलतोय मराठी निबंध ! | me kachra boltoy marathi nibandh

मी कचरा बोलतोय मराठी निबंध ! | me kachra boltoy marathi nibandh 

मी कचरा बोलतोय मराठी निबंध ! | me kachra boltoy marathi nibandh
me kachra boltoy marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण  मी कचरा बोलतोय मराठी निबंध ! | me kachra boltoy marathi nibandh बघणार आहोत.

मी कचरा बोलतोय !      'शी!  किती घाण पसरलीय ! मला दुर्गंधी अजिबात सहन होत नाही.'  मला पाहुन तुम्ही सगळे असेच म्हणतात, होय ना ?
       खरं तर सफाई कामगार रोज मला गोळा करून नेतात, पण त्यांनी एक दिवसाची रजा घेतली तरी इथे ढीग साचतो. मग माझ्यावर माश्या घोंघावतात.  डास अळी घालतात. उंदीर ,घुशी धुडगुस घालतात.  त्यांच्याद्वारे रोगराई पसरते.
       त्यापेक्षा तुम्ही मला घरी गोळा करा . वर मातीत टाका . माझे खत बनवा. झाडांना ते खात घाला ...म्हणजे मी पण खुश ! आणि तुम्ही पण खुश ! काय मग कराल ना एवढं !

    जगाच्या पाठीवर असे कोणते शहर अथवा गाव नसेल तेथे माझे अस्तित्व नाही . प्रत्येक ठिकाणी माझे रूप आहे . घरातील कचरा , औद्योगिक कचरा ,भाजी मंडईतील कचरा, व्यापारी  पेठेतील कचरा ,हॉटेल मधील कचरा इतर प्रत्येक ठिकाणी माझे रूप वेगवेगळे आहे. मी बर्‍याच लोकांना ही एकमेकांचा कचरा करताना मी पाहिलंय . 

    मला बोलण्याची निमित्त म्हणजे औरंगाबाद  मधील कचरा डेपोचा प्रश्न . या प्रश्नाची चर्चा अर्थात माझीच चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. मला आधी एवढं महत्व कधी मिळाले नाही . परंतु आज एवढे महत्व मिळाले आहे की , माझी खूप काळजी घेतली जाते. आणि महत्वाचे सांगायचे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून आले आहे त्यादिवसा पासून मला दररोज गाडी घ्यायला येते .

      माझा प्रवास कसा आहे . घरातून दारात, दारातून कचरा कुंडीत, कचरा कुंडीतून  कचरा वाहून येणारी गाडी ,गाडीतून माझ्यासाठी राखीव जागा असते. तिथे मला आणून टाकतात .तिथून पुढचा प्रवास पुनर्वापर करण्याकडे होतो . घरातील कागदाचे चिटोरे,  पेपरचे तुकडे ,कापडाच्या चिंध्या ,रिकामी खोके . प्रत्येक साहित्य माझ्याच  कुटुंबाचे  भाग असतात . त्याचे विघटन केल्यावर मी खताच्या स्वरूपात शेतात जाऊन पडतो. शेतातील धान्याच्या मुळाशी जाऊन दर्जेदार पिक उभं राहण्यास मदत करतो .एका अर्थाने पिकाच्या रूपाने माझा पुनर्जन्म होतो.


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • kachra kundi chi atmakatha
  • atmakatha nibandh in marathi
  • me kachra boltoy atmakatha

Previous
Next Post »