झाडे लावा झाडे जगवा | zade lava zade jagva essay in marathi

झाडे लावा झाडे जगवा | zade lava zade jagva essay in marathi

झाडे लावा झाडे जगवा | zade lava zade jagva essay in marathi
झाडे लावा झाडे जगवा | zade lava zade jagva essay in marathi



नमस्कार मित्रांनो आज आपण   झाडे लावा झाडे जगवा | zade lava zade jagva essay in marathi बघणार आहोत.

झाडे लावा झाडे जगवा


ग्लोबल वॉर्मिग च्या काळात झाडे लावणे  ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहेत. ठिकठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असे आपल्या कानावर पडत असेलच. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व कार्बन डायऑक्साइड सोशून घेतात.


झाडांच आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहेत . अशीच झाडांची संकल्पना देवराई ह्याला जन्म देते. देवराई - गावाबाहेर घनदाट पण विशिष्ट पद्धतीतून लावलेले झाडे. ही खूप जुनी संकल्पना आहे आणि ह्याच्या खूप जुन्या काळाशी संबंध आहे. जेव्हा आपण झाडे लावू तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल, ग्लोबल वॉर्मिग ची पातळी कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध हवा मिळेल. जर सगळ्यांनी किमान एक झाड लावायला घेतला तर आपला देश बहरून येईल आणि पर्यावरण साठी खूप पोषक ठरेल, म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा.


तासभर आक्सिजन विकत देनारा डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्भर फुकट ऑक्सीजन देणारे झाडांची कदर केली जात नाही? झाडे लावा ,जीवन वाचवा . राज्य सरकार ने 1 जुलै या एकाच दिवशी दोन कोटि वृक्ष लागणी ची महत्वाकांक्षा प्रकल्प हाती घेतला होता.  या अनुसंगाने सध्या सोशलमीडिया वर मेसेज येत आहे. वाढते तापमान, कमालीचा आकडा, पाण्याचे टंचाई, पावसाची अनिश्चितता या सर्वाना आपणच जबाबदार आहोत.  वाढते प्रदुषण आणि बेसुमार वृक्ष तोडीतुन घटते वन क्षेत्र मुळे ग्लोबल वार्मिंग ची झळ बसुन शेती क्षेत्र धोक्यात आहे.  पर्यावरण संतुलन साठी वृक्षारोपण योजना वर्षा नु वर्ष चालू आहे. योजनेचे नाव बदलते पण वनक्षेत्र ची स्थिति बदलत नाही.


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.


शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा 'हरितश्यामल' बनेल.



टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • zade lava paryavaran vachva essay in marathi
  • झाडे लावा देश वाचवा निबंध ​
  • jhade lava jhade vachava essay in marathi
Previous
Next Post »