माझे गाव मराठी निबंध | My village essay in Marathi | Maze Gav Essay In Marathi

माझे गाव मराठी निबंध | My village essay in Marathi | Maze Gav Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण माझे गाव मराठी निबंध , My village essay in Marathi , Maze Gav Essay In Marathi बघणार आहोत. 


माझे गाव... एक आदर्श गाव... 


माझे गाव लोणखेडा .मी  महाराष्ट्रातील लोणखेडा गावी राहते . पाच मिनिटांच्या अंतरावर तालुक्याचे शहादा गाव आहे. आमचे गाव लोणखेडा हे गोमती नदीच्या किनारी बसले आहे.त्यामुळे गावात शेतात जलसिंचनाची कामे केली जातात व भरपूर उत्पन्न मिळवले जाते.


लोणखेडा येथे पूज्य साने विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालय आहे.येथील परिसरातील ,पंचक्रोशी तील ,  गावातील विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक आहे.

लोणखेडा त्याच्या पूर्वेला तीन चार किलोमीटर अंतरावर सातपुडा कारखाना आहे .यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळतो.अशा प्रकारच्या औद्योगिक वसाहतींमुळे देशातून विविध राज्यातून काही कुटुंबे येथे वसली आहेत. लोनखेडा येथील त्यांना रोजगार मिळतो व त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

आमच्या गावात दरवर्षी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम होतो .गावाच्या विविध प्रकारचे झाडे लावली आहेत .त्यामुळे आमच्या गावात हिरवळीने नटलेले आहे .गावात विद्यालय,महाविद्यालय पण आहे.त्यामुळे माझे गाव साक्षर  आहेत .आमच्या गावात दारूबंदी, नशाबंदी आहे.

आमचे गाव तंटामुक्त आहे .येथे सर्व मिळून मिसळून राहतात .गावात कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही व सर्व आपले काम करतात.आमच्या गावची ग्रामपंचायत खूपच छान आहे .गावात दवाखाना ,पोस्ट ऑफिस आहे .

गावकरी खूपच कष्टकरी आहे.दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करतात .गावात वेगवेगळे सण  व  उत्सव परंपरे नुसार खूप प्रेमाने उत्सव साजरे केले जातात .गावात होळी, जन्माष्टमी ,स्वातंत्र्य दिवस सारखे सर्व उत्सव साजरे होतात.

आजच्या आधुनिक काळात आमच्या गावात डिजिटल ग्रामपंचायत सुरू झाली आहे .यामुळे गावाच्या विकास होण्यास मदत होते .ई-सेवा केंद्र ,स्वस्त धान्य दुकान व ग्रामपंचायती संकुल तयार करण्याचे काम सुरू आहे .यामुळे  व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे.

गावात बचत गटांची स्थापना करण्यात आली आहेत.खरंच आमचे गाव खुप सुंदर आहे . मला माझा  गावाच्या अभिमान आहे.





माझे गाव ,स्वच्छ गाव 



        माझे गाव गोगापूर आहे . माझे गाव 'स्वच्छ गाव ' म्हणून ओळखले जाते . गावातील प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवतात. घराचा परिसर स्वच्छ ठेवतात. गावाची सुमारे 3000 लोकसंख्या आहे . माझ्या गावात प्रमुख व्यवसाय  शेतकरी आहे . माझ्या गावात सर्वात जास्त मजूर आहे . माझ्या गावात लोहार ,धोबी ,न्हावी , गवळी लोक राहतात.


          माझ्या गावात रस्ते दररोज झाडली जातात. जमा झालेला सुका कचरा कचरा गाडीत टाकतात.ओल्या कचऱ्याचे खत तयार करतात .रस्त्याच्या कडेला वड ,पिंपळ , कडुनिंब ,गुलमोहर ,जांभूळ यांची झाडे आहेत . काही वर्षांन पुर्वी गावात लोकांनी  मिळून शेकडो रोप लावली होती . आज ते मोठी झालेली आहे. त्यामुळे सर्व गाव हिरवेगार आणि सुंदर दिसते. गावात गारवा असतो.

      माझ्या गावात किराणा दुकान आहेत.  गरजेच्या  वस्तू दुकानांवर मिळतात. गावात प्राथमिक शाळा , हायस्कूल आहे. गावात दहावीपर्यंत शिक्षण होते.  शाळेच्या आवारात हिरवीगार झाडे आहेत. 

      गावात दवाखाना आहेत. पोस्ट ऑफिस आहे .बस स्टॅन्ड जवळ ग्रामपंचायत आहे. माझ्या गावात श्रीकृष्ण मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे. गावाबाहेर हनुमान ची मंदिर आहे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर धारेश्वर महादेवाचे मंदिर आहे . ते खूप प्रसिद्ध आहे . तेथे महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते . 

माझ्या गावातील लोक खूप मेहनती आहेत. ते मिळून जूळून राहतात . आणि गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करतात.गावात सर्व घरांतील सांडपाणी बंद घरातून बाहेर सोडले जाते .गुरांचे शेण-मुत्र कंपोस्ट खड्ड्यात साठवले जाते आणि खत म्हणून त्याचा उपयोग करतात . त्यामुळे रोगराई पसरत नाही . 

असे माझे स्वच्छ गाव मला खूप आवडते.  खरच माझे गाव एक आदर्श गाव आहे.



तर मित्रांनो हा होता माझे गाव मराठी निबंध | My village essay in Marathi | Maze Gav Essay In Marathi  एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • my village information in marathi
  • marathi essay on my village
  • short essay on my village in marathi
Previous
Next Post »