मी नदी झाले तर मराठी निबंध | mi nadi boltey marathi nibandh

मी नदी झाले तर मराठी निबंध | mi nadi boltey marathi nibandh

नमस्कार मित्रांनो आज आपण मी नदी झाले तर मराठी निबंध , mi nadi boltey marathi nibandh बघणार आहोत.



मी नदी झाले तर...


     एकदा मी नदीकिनारी फिरायला गेले. नदीचे पाणी खूप सुंदर दिसत होते. नदीचे स्वच्छ आणि निर्मळ पाणी पाहून माझ्या मनात एक कल्पना आली . जर मी नदी झाले तर....

      किती छान होईल ,मी नदी झाले तर ! उंच डोंगरावरून मी डोलात वाहत येईन . माझे पाणी पांढरे शुभ्र असेल आणि खळखळत मी खाली येईन . वेगाने आल्यामुळे मला लांबवर जाता येईल. उंचावरून उडी मारेल त्यामुळे धबधबा तयार होईल . धबधबा पाहण्यास सर्व पर्यटक येतील. मी नदी झाले तर किती मज्जा येईल ना. सर्व सुंदर निसर्ग बघता येईल.


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

माझा आवडता ऋतू हिवाळा

अचानक आलेला पाऊस

   
     माझ्या दोन्ही तीरांवर लोक राहायला येतील. गाव वसतील. तिथे शेती करतील .फळझाडे, फुलझाडे फुलवतील . लोक माझे पाणी पिण्यासाठी वापरतील. माझ्या पाण्यात कपडे धुवायला येतील. पाणी प्यायला पशुपक्षी येतील .माझ्या पाण्यात  गाड्या धुवायला येतील. 

     माझ्या वरून पूल असेल . त्यावरुन खुप सार्या गाड्या जातील.माझ्या पाण्यात मासे खेळतील,पाण्यात पोहतील . बदक ,हंस , बगळा माझ्या पाण्यात खेळतील ,पोहतील . सर्वजण मासे पकडतील आणि मला त्यांची गंमत पहायला मिळेल. 

    माझ्या पाण्यात शंख-शिंपले तयार होतील . मासेमारी लोक येऊन माझ्या पाण्यातून मासे पकडून घेऊन जातील.  त्यांना माझ्यामुळे रोजगार मिळेल.  माझ्या पाण्यात नावाडी नाव चालवतील. नावेत प्रवास करणारे पर्यटन प्रवासाचा आनंद घेतील. नाव चालवून माझ्या तीरावर आराम करतील.


   मी ठरवले आहे !, जिथे अजिबात पाणी नाही, त्या प्रदेशात मी जाईन . तिकडच्या लोकांना पाणी पूरवीन.      पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. त्यामुळे त्या वेळी मला पूर येतो.  अशा वेळी लोकांचे नुकसान होऊ शकते . पूर ओसरल्यावर मी पुन्हा तुम्हाला मदत करीन.



तर मित्रांनो हा होता मी नदी झाले तर मराठी निबंध | mi nadi boltey marathi nibandh एक  छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.



टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • essay on river in Marathi
  • information on autobiography of river in Marathi
  • me nadi boltey marathi nibandh



Previous
Next Post »